बेळगाव : चिंचणी रायबाग येथील रिव्हर साईड शाळेच्या मैदानावर चिकोडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात बेळगावच्या संघाने दुहेरी मुकुटसह विजेतेपद पटकाविले. आता वरील दोन्ही सण राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

१७ वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात संत मीरा बेळगावने हावेरीचा ५-० असा पराभव केला विजयी संघाच्या आराध्या नाकाडीने 2 गोल,सकलेन मुल्ला, नेविन पत्की, समर्थ पनारे यांनी प्रत्येकी 1 गोल केले.उपांत्य सामन्यात बेळगावने धारवाडचा ४-०असा पराभव केला, विजयी संघाच्या सकलेन मुल्ला, रक्षित रामगौडा,नेवीन पत्की,आराध्या नाकाडी यांनी प्रत्येकी १ गोल केला. अंतिम सामन्यात बेळगावने बागलकोटचा पेनल्टी शूटआउटवर ३-१ असा पराभव करीत मागील पराभवाची परतफेड केली विजयी संघाच्या सकलेन मुल्ला नेवीन पत्की, रक्षित रामगौडा यांनी प्रत्येकी १ गोल केला. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यास सेंट झेवियस बेळगाव शहरने हावेरीचा ४-० असा पराभव केला, विजयी संघाच्या वेदिका कणबरकर व अपेक्षा मत्तीकोप यांनी प्रत्येकी २ गोल केले तर अंतिम सामन्यात बेळगावने चिक्कोडीचा पेनल्टी शूटआउटवर ३ – १ असा पराभव केला, विजयी संघाच्या प्रांजल हजेरी, तेजल हंजी, श्रद्धा पाटील यांनी प्रत्येकी १ गोल केला, सेंट झेवियर शाळेच्या मारिया मुजावर हिने सर्वोत्तम गोलरक्षणाची कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वरील फुटबॉल संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, मानस नायक रविशंकर मालशेट,चेस्टर रोझारिओ, ज्युलेट फर्नांडिस अनुराधा पुरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल व जाहिदा पटेल यांनी संघाचे खास अभिनंदन केले आहे.