- मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : कर्नाटक मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांना निश्चितपणे प्रतिनिधित्व मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले की, मंत्रिमंडळातील महिला प्रतिनिधित्वाबाबत मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायमांड अंतिम निर्णय घेतील. यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- एसआयआरवरून सुरू असलेल्या आंदोलनावर भाष्य
मतदार यादी पुनरीक्षणाच्या (एसआयआर) मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना जारकीहोळी यांनी यामध्ये कोणताही गोंधळ नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करत असून, काँग्रेसकडून कोणत्याही मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज करण्यात आलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने एसआयआरच्या मुद्द्यावर जनजागृती केली असून, मतदारांची नावे वगळण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या चुकीच्या अर्जांची योग्य पद्धतीने पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली असल्याचेही जारकीहोळी यांनी सांगितले.








