• अपघातातील मृतांमध्ये तीन तरुणांचा समावेश

बेळगाव : सौंदत्ती-धारवाड मार्गावर केएसआरटीसी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी घडला. मृतांची ओळख विनोद जोगेन्वर (२२), आकाश जाधव (२०) आणि रवी कुरबा (२२) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुण दुचाकीवरून सौंदत्ती-धारवाड मार्गावरून जात असताना त्यांच्या दुचाकीची केएसआरटीसी बसला धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की, तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सावदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपास सुरू केला. मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या प्रकरणी सौंदत्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.