- पहाटे अभिषेक व पूजाविधी ; दुपारी ३ वाजता महाप्रसादाला सुरुवात
बेळगाव : चलवेनहट्टी येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील महाप्रसादाचे (परव) आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी, सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
यादिवशी पहाटे ५ वाजता मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा केली जाणार आहे. देवाच्या सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल.
दुपारी ३ वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.








