बेळगाव : येथील दि. शिवनेरी को. ऑप. मल्टिपर्पज‌ सोसायटी लि. ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बिजगर्णीचे पुंडलिक जाधव उपस्थित होते.

प्रारंभी मारुती जाधव, पी. एस. मोरे, मोनाप्पा भास्कर, ललिता पाटील यांच्याहस्ते फोटो पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे वाय. पी. नाईक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या चोवीसाव्या वार्षिक सभेत चेअरमन पुंडलिक जाधव यांनी प्रास्ताविक करुन चोवीस वर्षातील पतपेढीची आर्थिक परिस्थिती कथन करुन असंख्य ठेवीदारांच्या विश्वासातून ही सोसायटी वाटचाल करीत आहे. सभासद, ग्राहक संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग, पिग्मी संकलक  यांच्या सहकार्याने भविष्यातही ही सोसायटी विकास करेल. दुर्बळ घटकांना कर्ज पुरवठा करुन त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे हाच उद्देश असल्याचे सांगितले.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अहवाल शाखाधिकारी पी. एन. सावगावकर यांनी सभागृहात सादर करून मंजुरी घेतली. अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

यावेळी वाय. पी. नाईक यांनी विचार व्यक्त करताना सहकारी पतपेढ्या कामगार, शेतकरी, गरजूंना कर्ज पुरवठा करुन त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी कार्य करतात परंतु कर्जाची परतफेड वेळेत होत नसल्याने संचालक मंडळाला वेगळे निर्णय घ्यावे लागतात. कर्जवसुली होणे गरजेचे असते. या सोसायटीच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील गरजूंना कर्ज पुरवठा केला जातो हे महत्त्वाचे वाटते. सहकारातून उन्नती व्हावी. विश्वास हाच खरा सहकाराचा मंत्र आहे, असे मौलिक विचार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर चेअरमन बिजगर्णीचे पुंडलिक जाधव, व्हा. चेअरमन ललिता पाटील, संचालक मदन बिजगर्णीकर, गुरूनाथ बामणे,मल्लापा पाटील, शटुपा सुतार, सावंत तारीहाळकर, सौ. चंदन पाटील, सौ. गीता मरकट्टी तसेच भरमू गावडा, उमेश सावगावकर,पी. आर. सावगावकर, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. खेळीमेळीत ही सभा उत्साहात संपन्न झाली. आभार मल्लापा पाटील यांनी मानले. समीक्षा सभागृह शिवम नगर गणेशपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.