बेळगाव / प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये वन महोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये बालचमुने उत्साहाने सहभाग घेऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. तसेच संपूर्ण परिसर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व कथन केले. यावेळी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी विविध स्वरूपातील फलकांची मांडणी करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण रक्षणाबाबत प्राचार्य डॉ.अरुण जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील समस्त शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.








