बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दि. २३ रोजी होणार आहे. दुपारी २ वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड येथे बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीदरम्यान १ जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन तसेच बेळगावमधील फलकांवर होणाऱ्या कन्नडसक्ती विरोधात मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, सचिव अॅड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर यांनी केले आहे.
May 22, 2026
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बेळगाव : निवडणूक आयोगाने जारी केलेले नियम व मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदारयाद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (एसआयआर) प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावी. कोणताही पात्र नागरिक मतदानाच्या […]








