बेंगळूरू : कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यांकन मंडळ, 6वी क्रॉस रोड, मल्लेश्वरम, बेंगळूरू – 560003 यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की, सन २०२६ च्या एसएसएलसी परीक्षा-१चा निकाल उद्या गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल https://karresults.nic.in या संकेतस्थळावर तसेच KarnatakaOne Mobile App द्वारे पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारेही निकालाची माहिती मंडळाकडून पाठविण्यात येणार आहे.

यावर्षी प्रथमच विशेष उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका (Marks Card) डिजिलॉकर (Digilocker) द्वारे २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून https://www.digilocker.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी मार्गदर्शन करणारी व्हिडिओ लिंक https://tinyurl.com/mw84wmh9 येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकालपत्रक संबंधित शाळांना देखील त्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या अध्यक्षांनी ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविताना आनंद व्यक्त केला आहे.








