बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याहस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी शुभम शेळके यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला तसेच सर्वांना आपल्या भाषेत बोलण्याचा अधिकार दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन संविधानाच्या मार्गाने समाज व देश टिकवणे हीच खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रमुख सल्लागार अशोक घगवे, रमेश माळवी, रंजित हावळाणाचे, सुरज जाधव, वैभव कुट्रे, रामचंद्र कुद्रेमणीकर आदी उपस्थित होते.