बेळगाव : आज शनिवार दि. १२ जुलै रोजी रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता पहिलीच्या तसेच सर्व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष सागर क .सावगावकर तसेच समितीचे कार्यकर्ते राजू कदम, दर्शन घाटेगस्ती, गजानन घाटेगस्ती, केदारी घुग्रेटकर, उत्तम कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. डी. पाटील तसेच शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गौंडाडकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आर. डी. पाटील पाटील यांनी मानले.
October 20, 2025
लक्ष्मीपूजन : भारतीय संस्कृतीत दिवाळीतील पाच दिवसांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन हा त्यातील एक दिवस. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी वैशिष्टयपूर्ण पूजा असते. या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली […]