• ‘क्लासिक इंटिरिओ फर्निचर पार्क’ शॉपिंग उत्सवात

बेळगाव / प्रतिनिधी

प्रत्येक घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे फर्निचर, त्याचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. आता उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात फर्निचर क्षेत्रातील नामांकित ‘क्लासिक इंटिरिओ फर्निचर पार्कचा’ स्टॉल उभारण्यात आला असून बेळगावकरांना वैविध्यपूर्ण अत्याधुनिक फर्निचर खरेदी करण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने घरगुती वापरच्या फर्निचरमधील इंपोर्टेड सोफासेट, वुडन डायनिंग सेट्स, होम इंटिरियर मटेरियल, वेल्स पण कंपनीचे सर्व उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. सदर प्रदर्शनाचे यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे शुक्रवार दि. १५ ते मंगळवार दि. १९ ऑगस्ट दरम्यान ५ दिवस आयोजित केले असून एकाच छताखाली १०० स्टॉल मधून सुमारे १० हजार गृहोपयोगी वस्तू मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ९ पर्यंत सुरु राहणार आहे. विशेषतः गणेशोत्सव काळात प्रदर्शन बेळगावकरांसाठी खरेदीची पर्वणी ठरणार आहे.