बेळगाव / प्रतिनिधी
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी इंटर्नशिप अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो विद्यार्थ्यांनी यामधून परिपूर्ण मार्गदर्शन प्राप्त करावे. असे प्रतिपादन आधार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. डी.टी.बामणे यांनी केले.
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप अभ्यासक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.
बीएचएमएस अभ्यासक्रमाचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांचा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना जबाबदारीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप यांनी या कालावधीतील प्रात्यक्षिके आणि जबाबदाऱ्यांच्या संदर्भात आढावा घेतला.
आधार हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी. जयमोहन यांनी देखील मार्गदर्शन केले. काडेश खोत यांनी आभार प्रदर्शन केले.







