• ह. भ. प. श्री. मल्लाप्पा गुंडू कलखांबकर यांचे निधन

सुळगा (हिं.) : मूळचे ब्रम्हलिंग गल्ली सध्या राहणार साईकॉलनी कलखांबकर बाग, सुळगा (हिं.) येथील रहिवासी श्री. मल्लाप्पा गुंडू कलखांबकर (वय ८० वर्षे) यांचे आज रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते श्री महालक्ष्मी मंदिर निधी कमिटीचे सेक्रेटरी तसेच गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते ह. भ. प. श्री. अजित कलखांबकर व श्री. जयंत कलखांबकर यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या सोमवार दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमीत होणार आहे.