बेळगाव : बेळगाव नगरीचीअष्टपैलु महिला क्रिकेटपटू श्रेया पोटे हिची कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने २२ जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय टी-२० महाराणी चषक या क्रिकेट स्पर्धेसाठी हुबळी टायगर्स या संघात निवड झाली आहे. श्रेया पोटे हिला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य व धारवाड विभागीय क्रिकेट समितीचे माजी सन्मान्वयक अविनाश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.