बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये ए. एम. शेख कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेच्या शानदार संयोजनामुळे ही स्पर्धा होमिओपॅथी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली.

आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. डी. टी. बामणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही स्पर्धा भरविण्यात आली. यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने मिळवला. तृतीय क्रमांक श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने प्राप्त केला. चौथे स्थान भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि पाचवे स्थान संकेश्वर मेडिकल कॉलेज यांनी मिळविले. बक्षीस, चषक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्पर्धा संयोजनासाठी संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे कार्यकारी संचालक डॉ. रोहित बामणे, डॉ. अभिषेक बामणे यांनी पुढाकार घेतला होता.उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप, डॉ. नूतन गुणदाळ, डॉ.सविता मठद, डॉ.जी. श्रीदेवी, डॉ. झिया यांनी विशेष परिश्रम घेतले.