बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहापूर विभागातर्फे गणेशोत्सवानिमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन आणि मोफत वितरण उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात समितीचे नेते नेताजी जाधव, सार्वजनिक गणेश महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण, जत्तीमठाचे सरपंच दत्ता जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, समितीचे नेते महादेव पाटील, शिवाजी हावळानाचे आणि राजकुमार बोकडे यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवाचे महत्त्व तसेच धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमधून समाजात एकोपा वाढविण्याची गरज याबाबत मनोगत व्यक्त केले. प्रकाशनानंतर उपस्थित गणेशभक्तांना आरती संग्रहाचे मोफत वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजित मजुकर आणि सुनील बोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी राकेश सावंत, यल्लापा मन्नोळकर, हेमंत शिंदे, देवाप्पा शहापूरकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन रणजित हावळानाचे यांनी केले.