• शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन

बेळगाव / प्रतिनिधी

संतीबस्तवाड येथे मशिदीतील इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्याच्या घटनेप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांनी दिली.

सुवर्ण विधानसौध येथे मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. एकाही आरोपीला अटक झालेली नाही. काहींना शंका आहे. चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. पाच पथके वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहेत. जनतेचेही सहकार्य असल्याचे ते म्हणाले.