बेळगाव / प्रतिनिधी
संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ विटंबना आणि चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकाचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आहेत. बेळगाव पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे. संतीबस्तवाड गावात झालेले प्रकरण हाताळण्यात पोलीस निरीक्षकांना अपयश आले आहे. धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ही कारवाई केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.