बेळगाव : “समृद्ध फाऊंडेशन फोर द डिसब्ल्ड” या संस्थेतर्फे रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी “समृद्ध युनिटी म्युझिक फेस्ट” असा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सिंधी सांस्कृतिक भवन, हिंडलगा रोड विजयनगर, बेळगाव येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमात सर्व अंध कलाकार प्रेक्षकांच्या समोर आपली कला सादर करणार आहेत. एक अंध व्यक्ती शिक्षण तसेच व्यवसायाच्या पलीकडे काहीतरी वेगळे करून दाखवू शकतो हे लोकांना दाखविणे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी फक्त १००/ – रू प्रवेश शुल्क आहे. तरी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी शिवनगौडा पाटील (अध्यक्ष) मोबाईल क्रमांक – 7483546490 , प्रशांत पोतदार (कार्यदर्शी) मोबाईल क्रमांक – 7760716234 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.