बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्य स्तरीय हॉकी स्पर्धा दि. २ ते ६ जुलै दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हॉकी बेळगाव संघाने सहभाग घेतला आहे.
यामध्ये संघात यशवंत बजंत्री, अशोक येळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोळ, समर्थ करडीगुद्दी, आर्यन घगणे, फैजल, रोहीत घुगरी, पार्थ कडलास्कर, आदर्श अमाती, अयान चोपदार फैजान मनेर, यशवंत बजंत्री, शशांक माळी, वीरेश दलाल, चंदन नेरडे, श्रीनिवास पुजारी, संजय बेवीनगडद, मुर्गेश कोटी, पवन कुमार गुगरी, श्रेयस नेरुर, कृष्णराज रोटी, विराज बेळगावी, आनंद गदग, गोपाल शेट्टीगिरी, आदित्य पट्टणशेट्टी , शिवराज बिरादार, सुजन वासन, पवन बोरण्णावर यांचा समावेश आहे. टीम सोबत हॉकी संघ व्यवस्थापक सुधाकर चाळके, गणपत गावडे जात आहेत.
आज दुपारी हरिप्रिया एक्सप्रेसने संघ रवाना झाला. संघाला शुभेच्छा देण्यासाठी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व क्रियाशील सदस्य प्रकाश कालकुंद्रीकर, विकास कलघटगी, सविता वेसणे, संदीप पाटील, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.
फेसबुक फ्रेंड सर्कल, व आर के फाउंडेशन, संतोष दरेकर,ओम अणवेकर आदित्य अणवेकर, श्रीनिवास बटुळकर यांनी हॉकी संघाचा प्रवासाचा खर्च पुरस्कृत केला आहे. कॅन्टोन्मेंट स्कूलचे हॉकी प्रशिक्षक साकीब बेपारी यांनी शुभेच्छा दिल्या.