बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट भाग १ हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील एका हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. हा कार्यक्रम रोटरी सदस्यांना नेतृत्व कौशल्य रोटरी विषयी सखोल ज्ञान आणि सदस्यांची कार्यक्षमता समृद्ध करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाभरातील रोटरी सदस्यांनी यामध्ये भाग घेतला. मुख्य अतिथी म्हणून प्रांतपाल अशोक नाईक यांनी कृतीतून प्रेरीत करणाऱ्या नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. सहाय्यक प्रांतपाल उदय जोशी,राजेश कुमार तळेगाव, विलास बदामी, जगन्नाथ घाणेरे ,गौरी शिरगावकर,बिनोय मोमया, प्रकाश सरस्वत अनिल जैन, डॉक्टर गोविंद मिसाळे ,एडवोकेट विजयलक्ष्मी मन्निकेरी, डॉक्टर स्फूर्ती मास्तिहोळी, प्रणव पित्रे, व कावेरी करूर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा मुमीगट्टी, ज्योती कुलकर्णी ,नागराज जोशी आणि संतोष हत्तरकी यांनी विशेष प्रयत्न केले.