बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वर्ष २०२५ -२६ साठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी सायं. ४:०० वाजता, लॉर्ड्स इको इन, बेलगाम येथे होणार आहे. या समारंभात नूतन अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी, सचिव रोटेरियन कावेरी करूर, कोषाध्यक्ष रोटेरियन सुरेखा मुम्मिगट्टी यांना अधिकार प्रदान करण्यात येणार आहेत.
या समारंभाला जिल्हा गव्हर्नर इलेक्ट रोटेरियन डॉ. लेनी द कोस्टा हे स्थापना अधिकारी तर असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन उदय जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.








