कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे बिजगर्णी हायस्कूलला वाॅटर फिल्टर भेट देऊन माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याची सोय करून दिली. हायस्कूलमध्ये शुद्ध पाणी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. वाॅटर फिल्टर शाळेत बसवण्यात आले.
उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांच्याहस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले. निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले (वेंगुर्ले) यांनी श्रीफळ वाढविले. वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविक करुन महात्मा गांधी संस्थेने राबवित असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला गेल्यावर्षी कावळेवाडी प्राथमिक शाळेला वाॅटर फिल्टर दिला होता. एम. पी. मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
अध्यक्षस्थानी वाय. एच. पाटील होते. यावेळी रूपेश किल्लेकर (गणेशपूर) यांचा मान्यवरांच्याहस्ते शाल श्रीफळ, पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी यल्लापा बेळगावकर, पुंडलिक जाधव, के. आर. भाष्कळ, मनोहर पाटील, पांडुरंग मोरे, मल्लापा मोरे, सौ. आशा बाचीकर, रेणुका मोरे, मोनाप्पा य. मोरे, सूरज कणबरकर, मनोहर प. मोरे, युवराज नाईक लक्ष्मण जाधव, यल्लापा बुरुड आदी मान्यवर उपस्थित होते.








