गोकाक / वार्ताहर
गोकाक येथील यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त असलेले सहायक उपनिरीक्षक लालसाब मिरानायक (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ६.३० च्या सुमारास गोकाक शहरातील एस.सी./एस.टी. वसतिगृहात वास्तव्यास असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते हुबळी एपीएमसी पोलिस स्थानकात सहायक उपनिरीक्षकपदी कार्यरत होते.
मृत लालासाब यांनी १९९४ मध्ये पोलिस दलात सेवा सुरू केली होती. ते सध्या गोकाक येथील ग्रामदेवता यात्रेच्या बंदोबस्तासाठी नियुक्त होते आणि एस.सी./एस.टी. वसतिगृहात थांबले होते. तिथेच आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. यासंदर्भात गोकाक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.