बेळगाव / प्रतिनिधी

नोकरी गमावल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या एका युवकाने आत्महत्या केली. मोदगा (ता. बेळगाव) येथे ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.रवी विरणगौड हट्टीहोळी (वय २४) असे मृत युवकाचे नाव असून तो एमसीए पदवीधर होता. गेल्या वर्षभरापासून पुण्यातील एका ग्लोबल कंपनीमध्ये तो नोकरी करत होता. मात्र, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्याला काही कारणांमुळे कंपनीतून कमी करण्यात आले होते.

या धक्क्यातून सावरून शकल्याने रवीने आपल्या मूळ गाव मोरगाव येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलिस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. या घटनेची नोंद मारीहाळ पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.