- पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
येळ्ळूर : येथील नेताजी युवा संघटनेच्या वतीने नेताजी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजेत यावेळी बोलताना प्रा. सी. एम गोरल म्हणाले, झाडे सजीवांसाठी आणि पर्यावरणातील घटकासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत असतात. प्राकृतिक संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वृक्षारोपण फार महत्त्वाचे आहे. यावेळी बोलताना मुख्याध्यापक संजय मजूकर म्हणाले, नैसर्गिक परिसंस्था टिकून ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. झाडामुळेच पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो त्यामुळे झाडांची लागवड व संगोपन करणे खूप महत्त्वाचे आहे. यावेळी रवींद्र गिंडे, रघुनाथ मुरकुटे, कृष्णा पाटील, शंकर मुरकुटे, सी एम उघाडे, पांडुरंग घाडी, जोतिबा पाटील, अनिल मुरकुटे, जोतिबा गोरल उपस्थित होते. यावेळी आंबा, काजू , बदाम, चाफा, व निलगिरी आदी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.







