- अध्यक्षपदी जगन्नाथ पाटील यांची निवड
बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक आज मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत यावर्षी मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यासाठी 2025-26 साला करीता नव्या कार्य करण्याची निवड जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारणी अध्यक्षपदी जगन्नाथ पाटील यांचे अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
काळभैरवनाथ मंदिरात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदीप मजूरकर उपस्थित होते. या बैठकीत मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात सलग नऊ दिवस विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीचा उत्सव मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याबाबत सर्वांनी एकमत दर्शविले.त्याचबरोबर नव्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.
नव्या कार्यकर्त्यांना अध्यक्षपदी जगन्नाथ पाटील यांच्यासह उपाध्यक्षपदी सचिन रंगरेज, कार्याध्यक्ष पी. जी. घाडी आणि सचिन पवार, सेक्रेटरी लक्ष्मण छत्रणावर आणि अक्षय शिंदे, खजिनदार शंकर चव्हाण, हिशोब तपासणीस प्रदीप कावळे, अण्णाप्पा मुंगळीकर ,सदानंद कडगावकर, ऋषिकेश हेब्बळी,सल्लागार श्रीकांत काकतीकर, विजय धामणेकर, महादेव पाटील, रवी शिंदे, सदानंद कदम, विजय सामजी, दशरथ धामणकर, गोपाळ सावंत, परशराम मेलगे यांच्यासह अन्य कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारणी तरुण कार्यकर्त्यांना विशेष प्राधान्य देण्यात आले.त्याचबरोबर सोमवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची मुहूर्तमेढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.