बेळगाव : जायंट्स मेन व जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच कामगार व औद्योगिक कायद्यांचे ज्येष्ठ व्यवस्थापन सल्लागार श्री. परशराम रुद्रप्पा कदम (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन जावई, एक नातू व तीन नाती असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निवृत्त पीएसआय राजश्री कदम यांचे ते पती होत.