• मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

कन्नडसक्ती विरोधात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मराठी भाषिकांनी उद्या थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जमावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. आज झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दंड थोपटत उद्या सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजी चौकात जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्र एकीकरण समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन द्या असे सांगत लेखी पत्रक दिले. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी माणसाचे शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या धर्मवीर संभाजी चौकात न जमता थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी माणसाने आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आज हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी मराठी माणूस थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आपली ताकद दाखवणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला.