बेळगाव : अनगोळ येथील प्रभाग ५७ च्या नगरसेविका आणि माजी महापौर शोभा सोमनाचे यांचे पती पायाप्पा सोमनाचे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता अनगोळ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजपचे युवा कार्यकर्ते दीपक सोमनाचे यांचे ते वडील होते.