बेळगाव / प्रतिनिधी
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या बेळगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनाला आज शुक्रवारी श्रीराम सेना हिंदुस्थानने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
विविध मागण्यांसाठी सलग चौथ्या दिवशी महापालिकेसमोर सामूहिक रजा आंदोलन करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची आज शुक्रवारी सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर वरील प्रमाणे आपल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत श्रीराम सेना हिंदुस्थानचा त्यांना पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान नगर विकास खात्यांच्या मंत्र्यांसोबत आज बैठक झाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचे कळते.