• रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम
  • २८८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे वैभव नगर येथील मादिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील ५६१ विद्यार्थ्यांची रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी करण्यात आली.

तपासणीसोबत विद्यार्थ्यांच्या वाढ व विकासाचे मूल्यांकन तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणीही करण्यात आली. याशिवाय २८८ विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक नेत्र तपासणी करण्यात आली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मादिनी स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

या प्रकल्पासाठी अमूल्य सेवा व योगदान दिल्याबद्दल डॉ. स्मृती प्रधान – स्मॉल मिरॅकल्स टीम आणि रोटेरियन रक्षिता उपाध्ये यांचे विशेष आभार व कौतुक करण्यात आले.

मुलांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारे एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.