- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर हनुमान युवक मंडळाचा आगमन सोहळा उत्साहात
कुद्रेमानी : गणेश चतुर्थीच्या उंबरठ्यावर कुद्रेमानी येथील हनुमान युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘कुद्रेमानीचा राजा’ या गणेशमूर्तीचे आज दुपारी चंदगड तालुक्यातील माणगाव येथील गणेशमूर्ती कार्यशाळेतून कुद्रेमानीकडे प्रस्थान झाले. सायंकाळी वाजत-गाजत आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणेशमूर्तीचे हनुमान मंदिरापर्यंत दिमाखात आगमन झाले.
आगमन सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘आला रे आला, गणपती बाप्पा आला’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. गणेश भक्तांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या आगमन सोहळ्यात सहभाग घेतला. यावर्षीची गणेशमूर्ती कुद्रेमानी गावचे माजी सरपंच विनायक नारायण पाटील यांनी मंडळाला देणगी स्वरूपात दिली आहे.
यावेळी हनुमान युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी अरुण देवण, शंकर पाटील, रुक्माणा कागणकर, शशिकांत पाटील व रवळू देवण
तसेच ग्रामस्थ शिवाजी गुरव, महादेव मराठे, रवी पाटील, बाळू कदम, धोडिबा पाटील, सुरेश पाटील, बबन गुरव, निलेश पाटील, लक्ष्मण कांबळे, गोविंद कांबळे, नाईकसमाज यांच्यासह गणेशभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







