- कोवाड येथील अंगणवाडी क्रमांक १०३ ला दिली भेट
कोवाड / लक्ष्मण यादव
लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत. त्यांना जपा, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याबरोबरच त्यांच्या पोषणाची काळजी घ्या, अशी सूचना आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली. कोवाड येथील अंगणवाडी क्रमांक १०३ ला भेट देऊन लहान चिमुकल्यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर तेथील अंगणवाडी सेविकांशी चर्चा करताना ते बोलत होते.

आमदारांनी अंगणवाडीला अचानक भेट दिल्याने तेथील अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अंगणवाडीमध्ये स्वतः येऊन लहान मुलांची चौकशी करणारा आमदार प्रथमचं पहिला अशा भावना अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केल्या. यावेळी तहसीलदार श्री. राजेश चव्हाण, माजी सैनिक गजानन पाटील, लक्ष्मण यादव, लक्ष्मण मनवाडकर, सुधीर पाटील, बाळू साळुंखे, पर्यवेक्षिका शीतल वळवी, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
