कोवाड / लक्ष्मण यादव
कोवाड प्राथमिक शाळेतील भोजन कक्षाची अवस्था अत्यंत दर्जाहीन असून भोजन कक्षाची खोली पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. खोलीमध्ये प्रचंड अस्वच्छता, किडे-किटकांची वावर तसेच आजूबाजुला गवत वाढले आहे. खोलीचे छत पडलेले आहे त्यातून पावसाचे पाणी गळते त्यातच या चिमुकल्या मुलांचा पोषण आहार बनवला जातो. या आहाराला खऱ्या अर्थाने पोषण आहार म्हणायचं का हा मला प्रश्न पडला आहे? अशा ठिकाणी बनवलेल्या आहाराची गुणवत्ता काय असेल ? हाच मोठा प्रश्न आहे. असे आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले.

तहसीलदार मा.श्री.राजेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत आमदारांनी या शाळेची पाहणी केली आणि तहसीलदारांना त्वरित या शाळेच्या भोजन कक्षाची दुरुस्ती करून शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावरचे संकट टाळावे. यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने निधी मंजूर करावा अशा सूचना दिल्या.

यावेळी कोवाड विभागातील प्रमुख पदाधिकारी लक्ष्मण यादव, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर,गजानन पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, सुधीर पाटील, बाळू साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते.
