- उपाध्यक्षपदी सुशांत पाटील यांची निवड
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्षपदी तानाजी चव्हाण (दर्याचे वडगाव) व उपाध्यक्षपदी सुशांत राजेंद्र पाटील (लक्षतीर्थ वसाहत) यांची निवड करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत 2026-27 सालाकरिता नूतन कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस सरदार जाधव, चिटणीस भाऊसो ठोंबरे, खजिनदार शिवाजी इंगवले यांची निवड करण्यात आली. मासिक बैठकीला अध्यक्ष अच्युत साळोखे यांच्यासह संचालक केशव माने, दयानंद घबाडे, युवराज मोळे, आनंदराव पाटील, गजानन विभुते, मोहन साळोखे, रमेश बनसोडे, चेतन पवळ, सतीश डावरे, आकाश पाटील, शालिनी सरनाईक,लता सोमवंशी आदी उपस्थित होते.








