बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोशीमळा खासबाग येथील रहिवासी असलेल्या कुरडेकर कुटुंबातील संतोष कुरडेकर (४४), सुवर्णा कुरडेकर आणि मंगला कुरडेकर यांनी आत्महत्या केली. तर सुनंदा कुरडेकर यांची प्रकृती गंभीर आहे . एका आई, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आणि एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.