खानापूर / प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील चिकले धबधबा पर्यटकांसाठी प्रवेश शुल्कासह पुन्हा खुला करण्यात आला आहे. सदर धबधबा प्रवेश शुल्कासह खुला करण्यात आला असला तरी योग्य देखरेखीअभावी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कांही अतिउत्साही पर्यटक काठाजवळ धोकादायक सेल्फी घेताना दिसत आहेत.

चिकले धबधबा पाहण्यासाठी प्रवेश शुल्क पुढील प्रमाणे आहे : प्रौढांसाठी 60 रुपये, मुलांसाठी 30 रुपये, पार्किंग शुल्क 40 रुपये (दुचाकी), 60 रुपये (चारचाकी), 100 रुपये (बसगाड्या), कॅमेरा शुल्क 50 रुपये आहे. सदर शुल्काची आकारणी स्थानिक वन समितीकडून केली जाते.