• विद्यार्थिनींची विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी
  • विद्यार्थी संघांनीही अनेक पदके पटकावली

खानापूर : नुकत्याच झालेल्या खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनीही विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक क्रमांक मिळविले.

मुलींच्या गटात देवयानी हेब्बाळकर हिने १०० मीटर, २०० मीटर धावणे आणि ११० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. विनया मिसाळ हिने गोळाफेकमध्ये प्रथम, तर थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. नमिता शिवठणकर हिने गोळाफेकमध्ये द्वितीय, तर विजया मिसाळ हिने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

श्रेया सावंत हिने ३ किलोमीटर चालण्यात प्रथम, तर वर्षा मोरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. विद्या मोरे हिने ८०० मीटरमध्ये प्रथम आणि १५०० मीटरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. रोशनी चव्हाण हिने ३००० मीटर धावण्यात प्रथम, तर श्रावणी कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

श्रृतिकक्षा पाटील हिने तिहेरी उडीत प्रथम आणि लांब उडीत तृतीय क्रमांक मिळवला. अनविता धबाले हिने ४०० मीटरमध्ये प्रथम, श्रद्धा गावडा हिने द्वितीय, तर भारता पाटील हिने १५०० मीटरमध्ये प्रथम आणि अपूर्वाने द्वितीय क्रमांक मिळवला. मुलींच्या संघाने ४ बाय १०० मीटर व ४ बाय ४०० मीटर रिले तसेच खो-खोमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कबड्डी आणि हॉलीबॉलमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

मुलांच्या गटात अभिनंदन देवलतकर याने १०० मीटर धावण्यात प्रथम आणि ११० मीटर अडथळा शर्यतीत तृतीय क्रमांक मिळवला. मंथन पाटील याने १५०० मीटर धावणे व थाळीफेकमध्ये प्रथम, तर गोळाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. आदित्य मिसाळ याने ३००० मीटरमध्ये तृतीय, वासुदेव मयेकर याने १५०० मीटरमध्ये द्वितीय, तर महादेव पाटील याने ५ किलोमीटर चालण्यात प्रथम क्रमांक मिळवला. समर्थ सुळकर याने ५ किलोमीटर चालण्यात द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये प्रथम, हॉलीबॉलमध्ये प्रथम आणि खो-खोमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात देवराज पाटील याने १०० व २०० मीटर धावण्यात प्रथम, तर राम कुलम याने दोन्ही प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवला. ४०० मीटरमध्ये ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम, तर श्रीराम गावडा तृतीय ठरला. ६०० मीटरमध्ये साईश सुतार प्रथम आणि अथर्व पाटील द्वितीय राहिला.

गोळाफेकमध्ये ज्ञानेश्वर शिवठणकर प्रथम आणि राम कुलम द्वितीय, तर थाळीफेकमध्ये ज्ञानेश्वर शिवठणकरने प्रथम क्रमांक मिळवला. या गटाने कबड्डी, हॉलीबॉल आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

विजेत्या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, मुख्याध्यापक जे. एम. पाटील, क्रीडा शिक्षक किरण पाटील तसेच सहशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.