बेळगाव : येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या बी. के. मॉडेल हायस्कूलला माजी खासदार इराण्णा कडाडी यांच्या निधीतून अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला.

स्मार्ट बोर्ड उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. पाहुण्यांची ओळख बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अविनाश पोतदार यांनी करून दिली. मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल विनोद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. एस. एन. शिवणगी, संयुक्त सचिव श्री. अरविंद हुनगुंद, बी. के. मॉडेलचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी, उषाताई गोगटे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. के. मादर, श्री. रवी घाटगे, शिक्षकवृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी इंग्रजी माध्यम शाळेची प्रगती, दूरदृष्टी आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून शिक्षण अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.