बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हरिपाठ अभंग तसेच मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कावळेवाडी येथे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्री हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

याचप्रमाणे खुल्या गटातील श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांनाही रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक, उपाध्यक्ष ॲड. नामदेव मोरे, सचिव सतीश जाधव, खजिनदार मनोहर प. मोरे तसेच शिक्षक कोमल गावडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी वाय. पी. नाईक यांच्याशी ९४२०२०४१०५ किंवा ७७०९११२१६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.