- म. ए. समिती महिला आघाडीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त आयोजित मूक दुचाकी फेरीत मराठी भाषिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर आणि माजी महापौर सरिता पाटील यांनी केले आहे.
एक नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या काळया दिना संदर्भात तसेच मूक फेरी यासंदर्भात महिला आघाडीच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत समितीच्या महिला नेत्यांनी मराठी भाषिकांना आवाहन केले.
येत्या रविवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मूक दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत सहभागी होऊन केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीला महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि मराठी भाषिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








