• ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन

बेळगाव / प्रतिनिधी

पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे खराब झालेला जुना पी. बी. मार्ग जलदगतीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ व वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष कौतुक केले.

रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे हलगा, बस्तवाड आणि अलारवाड परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची वाहतूक आणि आपत्कालीन सेवा यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते.

ग्रामस्थांच्या तातडीच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत प्रयत्न करून रस्ता पुन्हा सुरळीत केला.
रस्त्याची वेळेवर दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थांनी आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.