बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित ‘जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूल’मध्ये अत्यंत उत्साहात ‘क्रॉस कंट्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

सकाळी ७:१५ वाजता शाळेच्या आवारातून, मंडोळी रोडच्या दिशेने या स्पर्धेला सुरुवात झाली. शाळेचे प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्साहाने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि खिलाडूवृत्तीने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

तिसरी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अतिशय उत्साहाने भाग घेतला. त्यांनी आपली शारीरिक क्षमता, दृढनिश्चय, सांघिक भावना आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दलची जागरूकता दिसून आणली. शिक्षकांनीही यात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे हा उपक्रम अधिक ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरला.

शाळेत परतल्यानंतर, प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांनी सहभागी विद्यार्थ्यांना काही व्यायाम प्रकारा संदर्भात मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. टी. बामणे सर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. रोहित बामणे चे मार्गदर्शन लाभले.