• जिल्ह्यातील ८० स्पर्धकांचा सहभाग ; विविध वयोगटांत खेळाडूंनी पटकावली पदके

बेळगाव : बेळगाव जिल्हा सार्वजनिक शालेय शिक्षण विभाग आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेचे उद्घाटन डी. पी. ओ. जुनेदी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, शिक्षक सुभाष गंभीर, चंद्रू तोगारी, आय. एम. पटेल, स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • स्पर्धेतील पदकविजेते :

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात आराध्या पी. हिने दोन सुवर्णपदके, रुतुरा दळवी हिने दोन रौप्यपदके, तन्वी एच. हिने दोन कांस्यपदके, हेमा कोडिनीवाल हिने एक सुवर्णपदक, पूर्वी चौधरी हिने तीन सुवर्णपदके, तर वीरा पाटील हिने तीन रौप्यपदके मिळवली. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अक्षय अरुणकुमार याने एक सुवर्णपदक, तर श्रीशेल सोनाजी याने एक रौप्यपदक पटकावले.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात जान्हवी तेंडुलकर हिने दोन सुवर्णपदके, शर्वरी दद्दीकर हिने एक रौप्य व एक कांस्यपदक, प्रतीक्षा वाघेला हिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक, अन्वी सोनार हिने तीन सुवर्णपदके, तर लावण्या कोपद हिने एक सुवर्णपदक मिळवले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ऋत्विक दुबाशी याने दोन सुवर्णपदके, तर श्रीराज जोगिन याने एक सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांनी परिश्रम घेतले.