बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वैद्यकीय आणि दंत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. आधार हॉस्पिटलच्या तज्ञांनी या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तसेच त्यांना मार्गदर्शन केले

मुख्याध्यापक डॉ. अरुण जाधव यांनी स्वागत केले.वैद्यकीय तपासणी ‘आधार एज्युकेशन सोसायटी’च्या ‘शिवबसव होमिओपॅथिक कॉलेज’चे डॉ. चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या एकूण प्रकृतीचा आढावा घेण्यात आला.

दंत आरोग्य तपासणीचे काम ‘मराठा मंडळ’च्या ‘नाथाजीराव जी. हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस’च्या डॉ. रेखा आणि त्यांच्या समूहाद्वारे पार पाडण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली आणि तोंडाची स्वच्छता व दंत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय शिक्षिका गीता इटगी आणि भूमिका बाजीकर यांनी अत्यंत कार्यक्षमतेने केले.