• प्रतिटन ३,३०० रुपये दर निश्चित

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या नऊ दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवसरात्र आंदोलनापुढे अखेर राज्य सरकारने हार मानली आहे. सरकारने प्रति टन 3300 असा उसाचा भाव निश्चित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बेळगाव, बागलकोट, विजयपूर सह विविध जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 3500 रुपये प्रति टन भाव मिळावा या मागणीसाठी निदर्शने आरंभली होती . बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या घटनेनंतर जागे झालेले सरकार ऊस उत्पादकांच्या संघर्षापुढे झुकले आहे. शुक्रवारी यासंदर्भात साखर कारखाना मालकांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठक घेतली तसेच याबाबत समाधानकारक तोडगा तातडीने काढण्याबाबत आवाहन केले प्रदीर्घ चर्चेनंतर साखर कारखाना मालकांनी याबाबत प्रति टन 3500 रुपये इतका दर निश्चित करण्यावर सहमती दर्शविली . त्यामुळे आता तोडगा निघाला आहे.