- गळफास घेऊन संपविले जीवन
गोकाक / वार्ताहर
गोकाक तालुक्यातील चिक्कनंदी गावात प्रेमी युगुलाने ऑटो रिक्षामध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुनोळी येथील रहिवासी असणारे राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजिता चोबारी (२६) अशी आत्महत्या करणाऱ्यांची ओळख पटली आहे. राघवेंद्र याची स्वतः ची रिक्षा होती. तो रिक्षा चालवून गुजराण करीत होता. ते प्रेमी युगुल आहेत. त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली नव्हती. दरम्यान, रंजिता तिच्या घरच्या मंडळींनी दुसऱ्या तरुणाशी तीचे लग्न ठरविले होते. या गोष्टीला कंटाळून त्यांनी ऑटोने येऊन एका निर्जन परिसरात आत्महत्या केली. गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकाक तालुक्यातील पोलीस यंत्रणा सध्या यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीत गुंतली आहे. अशावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याने यंत्रणेला येथे धाव घ्यावी लागली.