बेळगाव : भाग्यनगर क्रॉस ६ येथील रहिवासी तथा म. ए समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौ. नीलिमा संभाजी चव्हाण (वय ६०) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक संभाजीराव चव्हाण, दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी ७ वा. चिदंबरनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इ. स. २००२-२००३ या काळात बेळगावच्या महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता.सध्या त्या अहिल्यादेवी सोसायटीच्या चेअरमन होत्या.
July 8, 2025
खुनाचा संशय अथणी / वार्ताहर अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडून गावोगावी फिरणाऱ्या एका तरुणाने नंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले […]