बेळगाव / प्रतिनिधी
आजारपणामुळे बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये आणले असता बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेलेल्या पोको प्रकरणातील कैद्याला पुन्हा ताब्यात घेण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.
बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे आणल्यानंतर पोको प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अनिल लंबुगोल (रा. मांजरी ता. चिक्कोडी) याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आजारपणामुळे तो बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेला. सकाळी ८.३५ वा. पळून गेलेला अनिल दिवसभर रुग्णालयात लपला होता आणि संध्याकाळी ६ वा. पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान, सतत शोध घेत असलेल्या हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याला बेळगाव शहरातील न्यायालयाच्या आवारात पुन्हा अटक केली आणि ताब्यात घेतले.









